💻

💻

अचानक उभी बस समोर आली आणि क्षणात घात झाला #death

नादुरूस्त एसटी बस खाली चिरडून यांत्रिक कामगाराचा मृत्यू
चंद्रपूर:- मूल येथील एसटी बसस्थानकावर उभ्या असलेल्या नादुरूस्त बस खाली चिरडून यांत्रिकी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (16 मे ) दुपारच्या सुमारास घडली. राजू दांडेकर असे यांत्रिकी कामगाराचे नाव असून ते चंद्रपूर येथून बस दूरूस्त करण्यासाठी आले होते. या दुर्देवी घटनेने एसटी कामगारांमध्ये शोककळा पसरली आहे.
सोमवारी गडचिरोली येथून चंद्रपूरकडे प्रवासी घेवून जाणारी चंद्रपूर आगाराची प्रवासी बस (क्रं. एमएच १४ एचजी-८२४३) येथील मूल बस स्थानकावरून चंद्रपूरकडे रवाना होण्यासाठी निघाली तेव्हा त्या बसचे अचानक ब्रेक नादुरूस्त झाले. नादुरूस्त बस मधील प्रवाश्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवून चंद्रपूरकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर नादुरूस्त एसटी बसची तक्रार चंद्रपूर आगारात नोंदविण्यात आली.
प्राप्त तक्रारीवरून नादुरूस्त एसटी बस दुरूस्त करण्यासाठी चंद्रपूर आगारातून राजु दांडेकर यांना मूल येथे पाठविण्यात आले. दुपारी १ वाजताचे सुमारास नादुरूस्त बसची पाहणी करून ब्रेक दुरूस्त करण्यासाठी यांत्रिकी कामगार बस खाली झोपले. बस खाली झोपण्यापूर्वी संबंधित यांत्रिकी कामगार किंवा बस चालकाने बस मागे-पुढे जावून नये यासाठी बसच्या चाकासमोर दगड ठेवले नाही. फेल झालेले ब्रेक दुरूस्त करीत असताना अचानक उभी बस क्षणात समोर आली आणि क्षणात घात झाला. बस खाली झोपुन दुरूस्तीचे काम करणाऱ्या यांत्रिक कामगार राजू दांडेकर यांच्या अंगावरून बस गेल्याने ते चिरडले गेले. गंभीर जखमी अवस्थेत एसटी कर्मचाऱ्यांनी जखमी राजु दांडेकर यांना येथील उपजिल्हा रूग्णालयात तातडी दाखल केले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून जखमी दांडेकर यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलवित असताना प्रवासा दरम्यान राजु दांडेकर याचा मृत्यू झाला.
उतारावर ब्रेकफेल झालेल्या बसच्या चाकाखाली दगड ठेवण्यात आला असता तर घात झाला नसता. परंतु, या छोट्याशा चुकीने एका यांत्रिकी कामगाराला आपला जीव गमवावा लागला. बस चालक रामचंद्र मेश्राम विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत