Click Here...👇👇👇

वाळु माफियांनी घेतला युवकाचा बळी #death

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून अधिकार्यांच्या आशिर्वादाने अवैध रेती तस्करी व वाहतुक सुरू आहे यात हायवा,ट्रॅक्टर ने दिवस रात्र अवैध वाळू तस्करी व वाहतूक होत असुन वाळु भरण्याकरिता गेलेल्या युवकावर ट्रॅक्टर चढवल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. विशाल रविंद्र गुरुनुले वय २१ वर्षं असे मृतकाचे नाव असुन तो पोंभुर्णा येथील रहिवासी आहे. तो ट्रॅक्टर मध्ये वाळु भरण्यासाठी रोजीने गेला होता आणि वाळु भरुन तो घरी परत येण्याकरीता निघाला असता वाळु भरलेली ट्रॅक्टर त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डाक्टरांनी त्याला मृत घोषित केले
पोंभुर्णा तालुक्यात अवैध वाळू घाट असुन काही दिवसांपूर्वी भिमणी येथील एकाचा पोकलॅंड ने बळी घेतला होता. आता पोंभुर्णा येथे एका युवकाला वाळू तस्करांमुळेच आपले प्राण गमवावे लागले आहे.
पोंभूर्ण्यात प्रशासनाला न जुमानता रात्रभर ट्रॅक्टर ने अवैध वाळु वाहतूक जोमाने सुरू आहे. घटनेच्या वेळी तिन ट्रॅक्टर ने वाळू वाहतूक सुरू होती. त्यापैकी रुपेश चन्नावार यांच्या मालकीची असलेला ट्रॅक्टर रामचंद्र वासेकर चालवित होता. अंधाधुंद ट्रक्टर चालविण्याच्या नादात विशाल ट्रक्टरवरून खाली पडला. त्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढवल्याने तो जागीच गतप्राण झाला. सदर अपघाताची माहिती ट्रक्टर चालक व मालकांनी बराच वेळ लपवून ठेवली असल्याने अपघाताची माहिती कळली नाही. नाही तर त्याचे प्राण वाचू शकले असते.
अपघात झाला तेव्हा आणखी दोन ट्रक्टर होते. वाळू घाटावर असलेल्या इतर दोन्ही ट्रॅक्टर ची चौकशी करून त्या ताब्यात घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.