मुल:- मुल तालुक्यातील मौजा फ़िस्कृटी येथील मूळचे रहिवासी असलेले हल्ली मु. मुल  वॉर्ड नं. १२ येथील निवासी  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांचे पती व मौजा फ़िस्कृटी ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन गुरनुले यांचे वडील  सेवानिवृत्त मुख्याध्यापक  श्री.रुषेस्वर बाबाजी पाटील गुरनुले  यांचे वय (73 ) व्या वर्षी दीर्घ आजाराने  दिनांक २८  मे २०२२ ला सकाळी ६.३० वाजता निधन झाले.
 त्यांची अंत्ययात्रा मुल येथील  राहते घरून दुपारी 3.०० वाजता निघणार असून उमा नदीच्या तीरावर असंख्य समाज बांधवांच्या, नातेवाईकांच्या व चाहत्यांच्या  उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं ,मुलगी जावई, बहिणी आणि नातवंडासह बराच मोठा आप्त परिवार आहे. गुरनुले गुरुजींना माळी समाजाच्या विविध संघटने कडून शिक्षक वृंदाकडून, असंख्य चाहत्यांकडून भावपुर्ण श्रध्दांजली.


