🌄 💻

💻

प्रसूती महिलांना शासनातर्फे मिळणारा मोबदला तात्काळ द्या #Jivati

सुदाम राठोड यांचे राज्यमंत्री बच्चु कडु यांना निवेद
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील प्रसूती झालेल्या महिलांना तब्बल ३ वर्षांपासून त्यांना शासनातर्फे मिळणारा मोबदला आजतागत मिळालेला नाही. म्हणून आज राज्यमंत्री बच्चू कडू यांना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे निवेदन देण्यात आले व साहेबांना विनंती करण्यात आली की या विषयावर जातीने लक्ष करून त्यांना न्याय मिळवून द्याल अशी विंनती करण्यात आली.
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुदाम राठोड, जय विदर्भ पार्टी जिवती तालुकाध्यक्ष रियाज सय्यद, युवा आघाडी जिवती शहर प्रमुख विनोद पवार, सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल राठोड उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत