खासदार क्रीडा महोत्सव २०२२ नागपूर #nagpur

Bhairav Diwase

नागपूर जिल्ह्यात चंद्रपूरच्या बॉडी बिल्डर् व कुस्तीपटु पदकाचे मानकरी
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
नागपुर:- नागपूर येथे सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सव २०२२ शरीर श्रेष्ठत्व स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे बॉडी बिल्डर् ने आपले कौशल्य दाखवुन 85 वजन गटात दुसरा क्रमांक प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्याला मान मिळवुन दिला त्याबदल चंद्रपूर शहरातील भिवापूर प्रभागातील राज अटकापुरवार यांचे विदर्भ बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन जिल्हा चंद्रपूर यांचे पदाधिकारी श्री. सुभाषजी लांजेकर, श्री. विवेकजी बुरडकर , श्री.खेमराजजी हिवसे, श्री. गणेशजी रामगुंडेवार यांचे तर्फे राज अटकापुरवार यांना शुभेच्छा देण्यात आले.

नागपुर येथे सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सव २०२२ कुस्ती स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे कुस्तीगीरानी आपले कौशल्य दाखवुन 35 वजन गटात कांस्य पदक प्राप्त करून चंद्रपूर जिल्ह्याला मान मिळवुन दिला त्याबदल चंद्रपूर शहरातील पठाणपूरा व दादमहाल प्रभागातील कुमारी श्रुती अजय टेंभुरकर हीचे आज कुस्ती दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चा मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार चंद्रपूर यांच्या तर्फे भेटवस्तू सह शुभेच्छा देण्यात आले. यावेळी प्रभागातील युवा तसेच हनुमान मंदिर समिती मित्र परिवार मधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून पुढील वाचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.