माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी गट ग्रामपंचायत केमारा येथे कचरा उचलण्याकरिता ‘ई रिक्षा घंटागाडी’ चे केले वितरण #Pombhurna

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य मा.राहुलभाऊ संतोषवार यांनी गट ग्रामपंचायत असलेल्या केमारा येथे 15 वा वित्त आयोग जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कचरा उचलण्याची व्यवस्था ‘ई रिक्षा घंटागाडी’ने करण्यासाठी घंटागाडीचे वितरण सरपंच श्री. सचिन पोतराजे यांच्या उपस्थितीत आज ग्रामपंचायतला करण्यात आले. #Adharnewsnetwork
गावातील कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे घरांतील कचरा एका जागेवर ठेवता यावा या उद्देशाने ग्रामपंचायतनी सर्व कुटुंबांना डस्क बिन चे वितरण करण्यात आले होते. घरातील व गावातील कचरा ई रिक्षा घंटागाडीने ग्रामपंचायतनी तयार केलेल्या न्याडेफच्या टाकीमध्ये टाकले जाणार आहे.घनकचरा व्यवस्थापन करिता देवई,केमारा,भटारी या तीनही गावामध्ये न्याडेपचे टाके तयार केले आहे.घरातील तसेच गावातील रस्त्याचे कचऱ्याचे विल्हेवाट या ई रिक्षा घंटागाडीने करणार असल्याने रस्ता स्वच्छ राहणार आहे. #Adharnewsnetwork
ग्रामपंचायतने चालू केलेली ही ई रिक्षा घंटागाडीची पद्धत गावातील नागरिकांना चांगलीच उपयोगी ठरनारी आहे.घरातील कचरा स्वत: वाहून जात नाही.तो उचलून न्यावा लागतो यामुळे प्रदूषण त्या जागीच मर्यादित राहत असले तरी न वापरातील सर्व जागा हळुहळू कचऱ्याने व्यापल्या जात असल्याने प्रदूषण तयार होते. त्यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतला जिल्हा परिषद च्या माध्यमातून मिळालेली ई-रिक्षा घंटागाडी प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होईल व गावाच्या स्वच्छतेसाठी निश्चितच त्याचा फायदा होईल असे प्रतिपादन राहुल संतोषवार यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य प्रेमदास इष्टाम, बापूजी शेडमाके, लक्ष्मण शेडमाके, प्रकाश आलाम, मनोज कनाके, प्रशांत मंडरे, वामन मडावी, अविनाश सोनटक्के, नलिनी इष्टाम, मंदाताई मंडरे, अश्विनी सोनटक्के, विलास कुलमेथे, रमेश कुंभरे, मिथून आत्राम उपस्थित होते.