Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

तहसिलदारच्या मध्यस्तीने शेतात जाण्यासाठी रस्ता निघाला #pombhurna

सोनापूरवासीय शेतकऱ्यांच्या मागणीला यश
पोंभूर्णा :-तालूक्यातील सोनापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी त्यांना नाल्यातून ये जा करावी लागायची. रस्ता नसल्याने, बैलबंडीने शेती उपयोगी सामान ने आण करण्याकरिता मोठी पंचाईत होत होती. त्यामुळे वडिलोपार्जीत वहिवाट असलेल्या शेतातील रस्ता काढून देण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन दिली मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही.त्यामुळे सोनापूर वासिय शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन शुक्रवार पर्यंत रस्ता काढून न दिल्यास आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्याची तात्काळ दखल घेत तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी स्वत: जाऊन विरोध असलेल्या शेतकऱ्यांची समजूत काढून सहा फुटाचा रस्ता काढून दिला. शेतकऱ्यांच्या रस्त्याची समस्या सुटल्याने शेतकरी आनंदात आहेत.
सोनापूर शेतशिवारातील भु.क्र. ८४,८५,९१,९२,९८,९९, १०१,१०५ या शेतात जाण्यासाठी व शेती उपयोगी सामान नेण्यासाठी बैलबंडीसाठी सुद्धा रस्ता नसल्याने अनेक शेतकरी धुऱ्याने ये जा करत होती. शेतीचे कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी पंचाईत होत असायची. अनेकदा प्रशासनाकडे रस्ता काढून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनकडे निवेदन दिले मात्र चार वर्षाचा कालावधी होऊनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. या शेतशिवारातील काही शेतकरी रस्ता काढण्यासाठी नकार देत असल्याने रस्त्याचा मार्ग अडकला. त्यामुळे सोनापूर वासिय शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन रस्ता काढून देण्यासाठी विनंती केली होती.
मागणीची दखल घेत शुक्रवारला तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी सोनापूर येथील अडसर असलेल्या शेतात जाऊन स्वत: शेतकऱ्यांशी चर्चा करून व सामंजस्याने तोडगा काढत रस्ता काढून दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत