🌄 💻

💻

गोवरी सोसायटीवर शिवसेनाचा झेंडा#Rajura


अध्यक्ष्यपदी शिवसेनेचे नागेश्वर ठेंगणे


राजुरा:- गोवरी सहकारी सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून राजुरा तालुक्यात पहिल्यांदाच शिवसेनेने सहकार क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली.
अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संघटनेशी सोयरीक करून 8 मतांनी विजय मिळवला. शिवसेनेचे नागेश्वर ठेंगणे हे अध्यक्षपदी तर संघटनेचे रामदास जीवतोडे यांची उपाध्यक्ष पदी विराजमान झाले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढण्यात आली होती.
सहकार क्षेत्रात इतिहासात पहिल्यांदा तालुक्यात शिवसेनेला सत्ता मिळविण्यात यश आले.
या निवडणुकीत शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांनी विशेष लक्ष देत यश संपादन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. ही शिवसेनेच्या वतीने सर्व प्रतिनिधिचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सदाशिव उरकुडे, अविनाश जेणेकर, बाळू वणकर, आणि नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत