💻

💻

पोवणी ग्रामपंचायत ला मिळाली ई-घंटागाडी #rajura

माजी सभापती सुनिल उरकुडे यांचा पुढाकार
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- पोवणी येथील सरपंच पांडुरंग पोटे यांच्या मागणीला मान देत आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याची पक्षाची परंपरा जपत सभापती सुनील उरकुडे यांनी जि. प. चंद्रपूर च्या 15 वित्त आयोगाच्या निधीतून ई घंटागाडी व फोगिंग मशीन पोवणी ग्रामपंचायत ला म जुर करून दिली त्याचे लोकार्पण काल दिनांक 25 मे रोजी पार पडले.
आलेल्या घंटागाडी चा योग्य वापर करत ग्रामपंचायत ने प्रत्येक घरापर्यंत घंटागाडी फिरवावी आणि प्रत्येक कुटुंबाने घरचा कचरा बाहेर इतरत्र न टाकता घंटागाडी चा वापर करावा ग्रामवासी आणि ग्रामपंचायत असा समन्वय झाला तरच गाव स्वच्छ व सुंदर होईल असे प्रतिपादन माजी सभापती सुनिल उरकुडे यांनी प्रसंगी केले.
सदर प्रसंगी सरपंच पांडुरंग पोटे,उपसरपंच सारिका फुलझेले, सुरेश जी झाडे,सचिव तुरारे, विजय फुलझेले संदीप वैरागडे तसेच ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत