Top News

शेतीत जाण्यासाठी रस्ता काढून द्या #pombhurna

सोनापूरवासीय शेतकऱ्यांची मागणी
पोंभूर्णा:- तालूक्यातील सोनापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने, बैलबंडीने शेती उपयोगी सामान ने आण करण्याकरिता मोठी पंचाईत होत असते. त्यामुळे वडिलोपार्जीत असलेल्या शेतातील रस्ता काढून देण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन दिली मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही.त्यामुळे सोनापूर वासिय शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन शुक्रवार पर्यंत रस्ता काढून न दिल्यास आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सोनापूर शेतशिवारातील भु.क्र. ८४,८५,९१,९२,९८,९९, आदी शेतात जाण्यासाठी व शेती उपयोगी सामान नेण्यासाठी बैलबंडीसाठी रस्ता नाही. अनेक शेतकरी धुऱ्याने ये जा करतात. शेतीचे कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी पंचाईत होत आहे. अनेकदा प्रशासनाकडे रस्ता काढून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनकडे निवेदन दिली मात्र चार वर्षाचा कालावधी होऊनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. या शेतशिवारातील काही शेतकरी रस्ता काढण्यासाठी नकार देत असल्याने रस्त्याचा मार्ग अडकला आहे. त्यामुळे सोनापूर वासिय शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन रस्ता काढून देण्यासाठी विनंती केली असून जर शुक्रवारला यावर तोडगा निघाला नाही तर शेतकरी तहसिल कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने