Top News

जामतुकूम येथील आरोग्य शिबिराचा ६०० लोकांनी घेतला लाभ #pombhurna


पोंभूर्णा :- तालुक्यातील जामतुकूम येथे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, ग्रामपंचायत जामतुकूम व समता फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ मे ला भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध आजारांच्या संबंधित ६०० लोकांनी आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटक तहसिलदार शुभांगी कनवाडे यांची तर अध्यक्षस्थानी उप मुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी धनंजय साळवे, विनोबा भावे हॉस्पीटलच्या डॉ.प्रा.सोनाली चौधरी, पोंभूर्णा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिकेत गेडाम, सरपंच भालचंद्र बोधलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आरोग्य शिबिराच्या परिसरात आरोग्यविषयक जनजागृती स्टॉल लावण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी,सर्व सामान्य चाचण्या मोफत करण्यात आले, शिबिरात ६०० लोकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
मोतिबिंदू, गर्भाशयाचे आजार, हाडांच्या संबंधित आजार,हायड्रोसिल, कॅन्सर आदी आजाराची तपासणी केल्या नंतर पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरातील ६० लोकांना मोतिबिंदू शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात आले यावेळी विविध आजारांच्या संबंधित आरोग्य शिबिरात सावंगी मेघे हॉस्पीटलचे व समता फाऊंडेशन मुंबई व पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची साठ लोकांच्या चमूंनी इथे वैद्यकीय सेवा दिली.सोबतच आशा वर्कर, चिंतामणी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जामतूकूम ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी व गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने