राजुरा येथील विधर्थिनी रिया लेखराजानी हिने पुणे विधापिठातून पटकावीले सहा सुवर्णपदक #Rajura

Bhairav Diwase

माजी आमदार निमकर यांनी केला सत्कार
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा येथील व्यापारी, राहुल ट्रेडर्स चे संचालक सुनिल लेखराजानी यांची कन्या कु.रिया हिने एम.बी.ए.(फायनान्स) या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विधापिठातून साहा सुवर्पदक पटकाविल्याबद्धल पुणे येथे राज्याचे उच्च व तन्त्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रास्ट्रीय मुल्यांकन आणी मान्यता परिषदेचे अध्यक्ष डॉ.भुषण पटवर्धन, पुणे विधापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर व मान्यवरांच्या हस्ते सहा सुवर्णपदक देऊन दि.12.05.2022 रोजी सन्मानित करण्यात आले होते.
त्याप्रित्यर्थ दि.16.05.2022 रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मित्रमंडळा समवेत घरी जाऊन कु. रिया चा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार आला व पुढील उज्वल वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अनिल हस्तक, अशोक मेडपल्लीवार, श्रीकांत दिक्षीत, सुरेश लेखराजानी प्रमुख्याने उपस्थीत होते.