💻

💻

देवलानायक वाचनालयाला दमाळ प्रकाशन मंडळाच्या वतीने मार्गदर्शन व पुस्तके भेट

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्याती देवलागुडा येथिल देवलानायक युवा मित्र मडळ बहुउद्देशीय संस्था कडून देवलानायक सार्वजनिक वाचनालयला भेट देण्यात आले. आपला तांडात शैक्षणिक बदल करण्यासाठी व विकास करण्यासाठी एकमेव मार्ग वाचनालय होय.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम राठोड गोर सीकवाडी संयोजक चंद्रपूर, विद्यार्थींना वाचन करण्यासाठी उत्साह निर्माण केले व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आसे सांगितले, दमाळ प्रकाशनाचे संचालक गणेश राठोड,करमठोट ( गोर सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांनी नवयुवक यांना वचारी पुस्तक भेट देऊन, सामाजिक कार्य करावे आसे सांगितले, सुखदेव वैजनाथ आडे सेवादासनगर यांनी उद्योग क्षेत्रात काम करावे आसे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास चव्हाण व आभार प्रदर्शन कैलास जाधव गोर सेना विभाग संघटक यांनी करण्यात आले या कार्यक्रमात गोर सेना सामाजिक संघटनांचे बाबाराव जाधव ,पवन जाधव,राहुल राठोड,संदिप राठोड,आदित्य चव्हाण,योगेश राठोड,राहुल जाधव, प्रेम पवार सर्व पदाधिकारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत