अखेर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री धावले गेवरा बुज येथील आजार ग्रस्त व अपघातात निधन झालेल्यांच्या मदतीला #saolinews #saoli

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील गेवरा बुज येथील बरेच दिवसापासून आजारी असलेल्या श्री. चोखाजी वाडगुरे यांच्यावर उपचार सुरु आहे मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मदत करण्यात आली व श्री. अजय मधुकर बावणे यांचे काही गंभीर आजाराने निधन झाले आणि श्री दिवाकर कारमेंगे हे काही दिवसापूर्वी अपघातात मृत्यूमुखी पडले. यांच्या कुटूंबीयांना मान. नाम. श्री विजयभाऊ वडेट्टीवार साहेब इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनवर्सन तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी आर्थिक मदत करून एक आधार दिला आहे.

यावेळी उपस्थित सावली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री नितीनभाऊ गोहणे हिरापूर येथील उपसरपंच शरद कन्नाके गेवरा बुजचे उपसरपंच टिळकभाऊ वाढणकर, ग्रा. पं. सदस्य रविभाऊ नन्नावरे, जेष्ठ कार्यकर्ते भाष्करजी बांबोळे,डोमदेव मारभते, माणिराम वाकडे, मनोहर कलसार, सीताराम गरमळे, सखाराम निकोडे, नीलकंठ चौधरी, केशव बांबोळे, सत्यवान झांपलवार, गोविंदा वाढणकर व संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
     श्री विजयभाऊ हे चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री असून त्यांनी अनेकांना आधार दिलेला आहे. गेवरा बुज येथील येथील वाडगुरे, बावणे व कारमेंगे यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांच्या समोर दुःखाचे डोंगर उभे होते.ही बातमी उपसरपंच टिळक वाढणकर यांनी सावली  काँग्रेस कमिटीचे अ ध्यक्ष श्री नितीनभाऊ गोहणे यांच्याशी चर्चा करून हा विषय श्री  विजयभाऊ यांच्या लक्ष्यात आणुन दिले. श्री भाऊ ने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ मदतीचे आश्वासन देऊन काही दिवसांतच ही आर्थिक मदत  संपूर्ण कांग्रेस चे पदाधिकारी जाऊन मदत पोहचवून दिले.
      श्री विजयभाऊ हे गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. अश्यातच त्यांनी आर्थिक मदत देऊन त्यांना आधार दिले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गरीब जनतेची सेवा करण्याचे वचन दिले आहे. त्या पीडित ग्रस्त कुटूंबीयांनी पालकमंत्री विजयभाऊ वडे्टीवार यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत