डॉ. अनिल रुडे "लोकमत टाईम्स एक्सलेन्स इन हेल्थकेअर" पुरस्काराने सन्मानित #gadchiroli

आरोग्य सेवा करतांना ठरले "लाखो दिलों की धडकन"
गडचिरोली:- हृदयाशी जवळचे नातं असलेले गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेले, अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असलेले हृदय रोग तज्ञ, सेवाभावी, व त्यागी वृत्तीने लाखो रुग्णांना आरोग्य सेवा देणारे, सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ. अनिल रूडे यांना "लोकमत टाईम्स एक्सलेन्स इन हेल्थकेअर " या मानाच्या पुरस्काराने माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांचे हस्ते गौरविण्यात आले.
डॉ.अनिल रूडे हे जिल्हा रुग्णालयातीलच नव्हे,तर गडचिरोली जिल्ह्यातील लाखो हृदय रुग्णासाठी आणि सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देणारे , कोरोना संसर्गजन्य आजारात जिवाची बाजी लावत, रात्रंदिवस आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारे जणू एक " देवदूतच" ठरले आहेत. हृदय रोग तज्ञ डॉ. अनिल रुडे यांनी रुग्ण सेवेचा वसा आपल्या अंगी स्विकारून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आरोग्य सेवेसाठी वाहून घेतलेले आहे.त्यांनी जिल्ह्यातील अनेक गरीब, निराधार रुग्णावर शस्त्रक्रिया करताना कुठलाही भेदभाव, व कुठलीही अपेक्षा न करता स्वतः फार मोठी जोखीम घेवून रुग्णावर निर्भयपणे शस्त्रक्रिया करून अनेकांना  "नवजीवन " मिळवून दिले आहे. डॉ. अनिल रुडे यांच्याकडून होत असलेली रुग्ण सेवा, सामाजिक सेवा ही जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णासाठी, नागरिकांसाठी डॉ. अनिल रुडे हे " मायेचा आधार " ठरलेले आहेत. 
डाॅ. अनिल रुडे हे रुग्णांची मनस्वी सेवा  करतात. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून "प्रशासकीय  जबाबदारीचे " कार्य करीत असल्याने, आपल्या सोबत काम करणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर  मनस्वी प्रेम करून त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी होवून, त्यांना अनेकदा मदतीचा हात दिलेला आहे. त्यांनी केलेली व करीत असलेली रुग्ण सेवा. सर्वत्र "लोकप्रियतेचे" शिखर गाठलेले असून .डॉ.अनिल रुडे यांच्या कार्य कुशलतेवर , कर्तुत्वावर विश्वास ठेवून , जिल्ह्यातील अनेक रुग्ण, आजही स्वत:वर उपचार करून घेतात, व उपचारां नंतरही डॉ. रुडे त्यांचेशी आपुलकीने भेटीला जातांना दिसतात. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक  रुग्णांना , "नवजिवन" देऊन , प्राणप्रतिष्ठा देवून त्यांच्या पाठीशी सदैव "कणखर" पणे उभे राहाणारे  डॉ. रुडे अश्या अनेक गरीब, व असाह्य , समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे.
आज प्रत्येकाला स्वतःचे कर्तुत्व फुल वितांना अनेकांच्या नजरेसमोर दिसत आहेत. डॉ. रुडे यांचे प्रशासकीय,सामाजिक कार्य,कर्तुत्व, जबाबदारीचे पद त्यांच्या काही विरोधकांना पचनी न पडल्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रकारचे खोटे आरोप ठेवूनही विरोधकांना शेवटी अपयशी ठरावे लागले. समाज जीवनात कमविलेली प्राणप्रतिष्ठा मलिन करण्याचा काही हितशत्रूंनी चंग बांधलेला आहे. डॉ. रुडे यांना बदनाम करण्यासाठी ज्यांनी ...ज्यांनी पाऊल उचलेले आहेत. त्यांच्यावर चिखल उधडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांचा पूर्व इतिहास तपासून बघण्याची नितांत गरज आहे. डॉ. रुडे यांच्या पाठीशी अनेक " जनसमुदाय " सावली सारखा , तसेच प्रखरपणे उभा आहे. विरोधकांकडून होणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करायला डॉ.रुडे सदैव " निर्भयपणे " तत्परतेने उभे आहेत एवढे सत्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत