तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरांवर वाघाचा हल्ला #chandrapur

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला केल्याची घटना आज दि. ८ मे ला सकाळच्या सुमारास घडली. गोपाल दिवाकर आत्राम असे वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.
सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरु असून मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जगलात जात असतात. दुपारपेट येथील गोपाल दिवाकर आत्राम हे तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. दरम्यान वाघाने तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरावर हल्ला करुन जखमी केले. त्यांना उपचारार्थ गोंडपिपरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.