काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा सुफडा साफ #Jivati

जिवती सोसायटी वर भाजपा व गोंडवानाचा झेंडा
जिवती :- तालुक्यातील आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्था जिवतीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात भाजपा व गोंडवाना गणतंत्र पार्टीचा दणदणीत विजयी प्राप्त करून काँग्रेस - राष्ट्रवादी च्या युतीचा सुफडा साफ केला.
विजयी उमेदवारांमध्ये सतलूबाई गोदरू पाटील जुमनाके, विठ्ठल केजगीर, ईश्वर मुस्ताकुरे, नामदेव भोजू जुमनाके, शंकूतला हनुमंत कुमरे, गोदाबाई जुमनाके, चिन्नू आडे, कर्नू कोडापे, जंगू मलकू कोटनाके, गणेश राठोड, बळीराम संभाजी चंबटवार, दुदम गणपती वाजगीर, विठ्ठल नेदेवाड यांचा समावेश आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, जिल्हाउपाध्यक्ष निशिकांतजी सोनकांबळे, भाजपा तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, भाजयुमो जिल्हा महामंत्री महेश देवकते, जेष्ठ नेते भीमराव जुमनाके, तालुकाध्यक्ष ममताजी जाधव, माजी सभापती भीमरावजी मेश्राम, तुकाराम वारलडवार, नामदेव सलगर, दत्तात्रे माने, रमेश पुरी, इस्माईल शेख, सुरेश केंद्रे सामाजिक कार्यकर्ते मंगुजी मडावी, मारू पाटील नैताम, नगरसेवक जमाल्लूद्दीन शेख, क्रिष्णा सिडाम, नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, गो. ग. पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत