Top News

महाराष्ट्र दिन तथा आंतरराष्ट्रीय कामगार दिना निमित्त सत्कार संपन्न.

महाराष्ट्र दिन तथा आंतरराष्ट्रीय कामगार दिना निमित्त सत्कार संपन्न.

- नेफडो तर्फे कराटे प्रशिक्षक व महावितरण विद्युत कर्मचाऱ्यांचा सत्कार.
- विध्यार्थीनी सादर केले कराटे प्रात्यक्षिक.
- विध्यार्थीना बिस्कीट, कंपोस किट वाटप.


राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा  द्वारा महाराष्ट्र दिन तथा आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्य स्थानिक सोनिया गांधी इंग्लिश स्कुल येथे कराटे प्रात्याक्षिक व कराटे प्रशिक्षक, महावितरण कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित विध्यार्थीनी कराटे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष केंद्रित केले. यावेळी विध्यार्थीना बिस्कीट व कंपोस सेट वितरित करण्यात आला. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विजयकुमार जांभुळकर, अल्का सदावर्ते, दिलीप सदावर्ते, संतोष देरकर, रजनी शर्मा, कृतिका सोनटक्के आदींची उपस्थिती होती. 


सत्कारमूर्ती म्हणून जे.एस.के.ए. कराटे असोसिएशन चे मुख्य प्रशिक्षक रवी कोपुल्ला, शाखा मुख्य प्रशिक्षक बंडू करमरकर, प्रशिक्षक प्रकाश पचारे, महावितरण चे विद्युत कर्मचारी मनीषकुमार प्रेमदास रामटेके, लाईनमन, राजू रामदास ठाकरे, लाईनमन आदींचा शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा रजनी शर्मा यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षपूजन करण्यात आले.


 यावेळी करुणा गावंडे - जांभुळकर  यांनी पर्यावरण गीत सादर केले. वृक्षप्रतिज्ञा बादल बेले यांनी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा देशमुख यांनी केले. प्रास्ताविक रजनी शर्मा यांनी केले. आभार सुनैना तांबेकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या पदाधिकारी व सभासदानी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने