जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; 85 आरोपी अटकेत #chandrapur #Rajura


चार चाकी वाहनासह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
राजुरा:- वरुर येतील परवाना धारक जुगार क्लब वर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या टीमने काल रात्रो अकरा वाजताच्या दरम्यान टाकलेल्या धाडीत 85 आरोपींना अटक करून कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांवर धक्काबुक्की झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे घडली.
विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरूर रोड येथे परवानगी घेऊन मागील काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरु केला. मात्र नियमबाह्य जुगार चालवित नियमांची पायमल्ली होत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुप्त माहिती मिळताच सापळा रचून रात्रो अकरा वाजता धाड टाकण्यात आली. या दरम्यान पळापळी, घाई गर्दीत पोलिसांसोबत धक्कामुक्की झाली त्यामुळे तोटा वेंकटेश, शेर श्रीकांत, श्रीनिवास गंगारेड्डी राहणार मंचेरियाल तेलंगणा या तिघांवर कलम 310, 332, 353 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 85 जणांवर जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून जवळपास 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरूर हे गाव तेलंगणा सीमेलगत असल्याने काही जुगार आंबट शौकीन तेलंगणा राज्यातून येऊन जुगार खेळत होते. जुगार अड्ड्या लगत शाळा व मंदिर असल्याने नागरिकांनी विरुर पोलिसांना तक्रार दिली. येथील ठाणेदारांनी जुगार अड्याचा परवाना रद्द व्हावा म्हणून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला होता. सदर कारवाही अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असे सूत्रांनी सांगितले. समोरील तपास विरूर स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत