जिल्हा निधी पंचायतराज योजना अंतर्गत ग्रामपंचायत च्या माध्यमातून माजी जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांच्या पुढाकाराने पाण्याच्या कॅन चे वितरण #chandrapur


पोंभुर्णा:- विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या सेवेत तत्परतेने कार्य करणारे केमारा-देवाडा खुर्द जि.प. क्षेत्राचे माजी सदस्य राहुल संतोषवार यांच्या पुढाकाराने जिल्हा निधी पंचायतराज योजना सन 2021-22 अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत कसरगटा येथील जनतेला पिण्याच्या पाण्याचे कॅनचे वितरण सरपंच सौ. वर्षा पिपरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी,महिला बचत गट ग्रामसंघ, देवस्थान यांना राहुल संतोषवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेला आरोग्यमय पाणी पिण्यासाठी थंड व सोईस्कर झालेले आहे.

कसरगटा येथील जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत ग्रामपंचायत च्या सभोवताल परिसराच्या प्रिकास्ट व्हालकंपाऊंड चे भूमिपूजन सरपंच सौ. वर्षा एच. पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित उपसरपंच तिरुपती कुंभरे, ग्रा.प.सदस्य संदिप गव्हारे, धर्मापाल उराडे, सौ.रुचिता कोवे,वैशाली पेंदोर,ग्रामसेवक पेंदोर ज्येष्ठ नागरिक दिलीप धोडरे, जयंत पिंपळशेंडे, राहुल वासेकर, संतोष बोलमवार व इतर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत