🌄 💻

💻

कसरगट्टा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या #suicide

पोंभूर्णा :- तालुक्यातील कसरगट्टा येथील शेतकऱ्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडली. कसरगट्टा येथील हनुमान धोडरे वय ५७ वर्ष असे आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील कसरगट्टा येथील शेतकरी हनुमान धोडरे दि.१९ मे गुरूवारला सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घरातून बाहेर पडला होता. गावानजीक असलेल्या नारायण धोडरे यांच्या शेतातील सागवणच्या झाडाला गळफास घेऊन त्यानी आत्महत्या केली. पाच महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीचेही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
सदर घटनेचा तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष येनगंदेवार करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत