जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा बैठक संपन्न #chandrapur

राज्यातील आघाडी सरकार आरक्षणाचे मारेकरी ठरले आहे:- योगेश अण्णा टिळेकर


चंद्रपूर:- भाजपा ओबीसी मोर्चा महानगर व ग्रामिण जिल्हाची बैठक प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंञी हंसराज अहिर,प्रदेश महामंञी संजय गाते,पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण,प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.प्रकाश बगमारे, जिल्हाध्यक्ष (ग्रा) देवराव भोंगळे,जिल्हाध्यक्ष(म)डाॅ.मंगेश गुलवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पळली.
या बैठकी दरम्यान पुढे होणा-या विविध कार्यक्रमाविषयींचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला मार्गदर्शन करतांना टिळेकर म्हणाले,मध्यप्रदेश सरकार इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळवून देऊ शकले.माञ राज्यातील आघाडी सरकार आरक्षणाचे मारेकरी ठरले आहे.या संदर्भात आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलने करण्यात आली.यापुढे या संदर्भात मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे टिळेकर यांनी सांगितले. यानंतर उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली.
याप्रसंगी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष(म) विनोद शेरकी,जिल्हा महामंञी(म)शशीकांत मस्के,जिल्हा महामंञी(ग्रा) डाॅ.अंकुश आगलावे,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा(म)अंजली घोटेकर,रत्नमाला भोयर,नितीन गुडधे,राजेंद्र अडपेवार,प्रदिप किरमे,वंदना संतोषवार,प्रा.अशोक सालोटकर,मनोज भूपाल,महेश कोलावार, मनोज इटनकर,मधुकर राऊत,राजेंद्र खांडेकर,रवी लोणकर,सुभाष ढवस,सुशांत आजमने,प्रेमलाल धोटे,सुभाष तेटवार,सुषमा नराणे,अरुण तिखे,रोहण काकडे,तुळशीदास भुरसे,सचिन संदूरकर,शंकरराव सातपुते,संजीवनी वाघरे,शुभांगी बोनमपल्लीवार,सुषमा नखाणे,निरुपा मुत्यालवार,गीता महाकुलकर,शालु कन्नोजवार,
अर्जून रविदास,सचिन रविदास,राकेश रविदास,
श्याम बोबडे,राम हरणे,हन्सन राव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत