जाहिरात... Advertisement... विज्ञापन

शिंदे महाविद्यालयाने राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम #results

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीने उत्तम निकालाची परंपरा कायम राखत , बारावीच्या परीक्षेच्या निकालत उत्तुंग झेप घेतली आहे.
‌‌ विज्ञान विभागाचा निकाल 99.7 टक्के लागला असून प्रावीण्यासह 28 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 109 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.वेदांत विनोद धोबाळेकरमकर याने 600 पैकी 569 गुण घेत 94.83 गुणांसह तालुक्यात प्रथम स्थान प्राप्त केलेले आहे. वेदांत बाळेकरमरकर याने नागपूर विभागातून पीक विज्ञान विषयात 200 पैकी 200 गुण प्राप्त करत एक नवीन उच्चांक प्राप्त केला आहे. पीक विज्ञान विषयासाठी प्रा. नरेश जांभूळकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर कु. विशाखा रमेश अनमोलवार या विद्यार्थ्यीनीने 551 गुण घेत 91.83 टक्के गुणांसह तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. नेहान निसार शेख याने 87 .67 टक्के गुण घेत महाविद्यालयातून तृतीय स्थान प्राप्त केलेले आहे . तर कु. निशा बलवंत प्रसाद हिने 86.17 टक्के गुण घेत महाविद्यालयातून चतुर्थ स्थानावर आलेली आहे. विज्ञान विभागात 80 टक्केच्या वर बारा विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केलेले आहे.
       कला विभागाचा निकाल 90 टक्के लागला असून तालुक्यात ऊत्तम निकाल दिला आहे. कला विभागात कुमारी दिव्या शरद राजूरकर हिने 489 गुण प्राप्त करून 81.50 टक्के गुणांसह  महाविद्यालयातून प्रथम क्रमांकावर आहे . तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तर प्रणिता दादाजी आबिटकर तिने 466 गुण घेत 77. 67 टक्के गुणांसह  महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे व तालुका स्तरावर त्रृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.  कु. लक्ष्मी अनिल वाडकर तिने 70 .17  टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कला विभागातील दोन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेले असून प्रथम श्रेणीत 25 विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.
वाणिज्य विभागाचा निकाल 96. 49 टक्के लागला असून अनुराग विजय सुपी याने 498 गुंठ्यात 83 टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर अंजुम अहमदखान पठाण 473 गुण घेत 78.83 गुणांसह तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे . तर तुषार अरविंद वासेकर याने 70. 83 गुण घेत तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे .वाणिज्य विभागातून तीन विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केलेली आहे, तर दहा विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केलेली आहे. 
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे ,सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे ,प्राध्यापक डॉ. मोते, डॉ. हटवार, ढोक,  चव्हाण, मोहरकर, जांभूळकर, गुंडावार, चौधरी, सौ. पोटदुखे व सर्व कर्मचारी वर्गानी अभिनंदन व कैतुक केले.  सर्वांनी गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत