जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ऑनलाईन पासवर्ड सुरक्षा व जबाबदारी......

चंद्रपूर:- सध्या सायबर गुन्हेगार हे सामान्य नागरीकांना लक्ष करीत असतांना त्यांचे ऑनलाईन प्लॅटफार्मवर असणारे अनेक अकाउंट हॅक करुन किंवा त्या अकाँउंटचा पासवर्ड ब्रेक करुन संबधीत अकाउंटचा ताबा मिळवितात व सामान्य नागरीकांना/एखाद्या संस्थेला आर्थिक, मानसिक, तसेच शारीरीक नुकसान पोहचवु शकतात.
तरी सर्वांना विनंती आहे की, त्यांनी आपला ऑनलाईन अकाँउंटचा पासवर्ड हा सहज सोपा ठेवु नये. कठीण पासवर्ड असल्यास सायबर क्रिमीनलला तो ब्रेक करणे सोपे जाणार नाही व आपली ऑनलाईन सुरक्षीतता अबाधीत राहील. पासवर्ड हा नेहमी कमीत कमी 8 अंकी अल्फान्युमेरीक व सिम्बालसह असावा. कोणत्याही अनोळखी ऑनलाईन पोर्टल/वेबसाईटवर लॉगीन करु नये तसेच आपला पासवर्ड कोणासही शेअर करु नये. आपल्या सोबत अशाप्रकारे कोणताही अपराध घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन अथवा ऑनलाईन सायबर पोर्टल www.Cybercrime.gov.in किंवा 1930 यावर तक्रार नोंदवावी. त्याचप्रमाणे अधीकच्या माहीतीसाठी @cyberdost, @spchandrapur या ट्विटर हँन्डेलला भेट द्यावी असे आवाहन अ अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत