Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

गडचांदूर पोलिसांची दमदार कामगिरी #chandrapur #gadchandur #police #Arrested

गडचांदूर पोलीसांनी केले घरफोडी करणाऱ्या टोळीस गजाआड
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- पोलीस स्टेशन गडचांदूर येथे फिर्यादी नामे रमेशचंद्र नारायण भालेराव, वय ७० वर्ष, धंदा. सेवानिवृत्त रा. वॉर्ड क्र ०५, गडचांदुर ता. कोरपना, जि. चंद्रपुर यांनी तक्रार दिली की, ते व त्यांचे घर शेजारी राहणारे धनंजय घुले हे त्याचे कुटुंबासह बाहेर गावी घराला ताला लावुन गेले असता दिनांक १९/०५/२०२२ ते दि ०३/०६/२२ चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचा ताला तोडुन १) ओनीडा एल इडी टी व्ही कि अं २२,०००रू, २) सीसीटीव्ही कॅमेरा चा डी व्ही आर कि अं ८,०००रू, ३) जुना वापरता एसर कंपनीचा लॅपटाप कि अं ७,०००रू, ४) ५ ग्रॅम व ३ ग्रम सोन्याची दोन अंगठी कि अं २४,००० रु, ५) जुना वापरता एच पी कंपनीचा लॅपटाप कि अं ८,००० रू अशा एकुन ६९,००० रु चा माल चोरून नेला अशा तक्रार वरून अज्ञात चोरट्याविरूध्द पो.स्टे. गडचांदूर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
 गडचांदूर पोलीसांनी सदर गुन्हा उघडकीस आणुन आरोपी नामे १. मैनुददीन मन्सुर आलेख जिलानी वय २६ वर्ष रा. बस स्टॅन्ड मागे गडचांदुर वार्ड क्र. ०६, २) निवास अशोक रॉय वय २५ वर्ष रा. मानिकगढ सिमेंट कंम्पनी क्वार्टर गडचांदुर, ३) गजेंद उर्फ गज्या बालाप्रसाद ढगे वय २३ वर्ष रा रेल्वे स्टेशन जवळ वार्ड क्र ६ गडचांदूर, ४) पियुश उर्फ अरून सोनटक्के वय १९ वर्ष रा रेल्वे स्टेशन जवळ वार्ड क ६ गडचांदूर यांना अटक केले असुन त्यांच्या कडून चोरीस गेलेल्या मालापैकी १) ओनीडा एल इडी टी व्ही कि अं २२,०००रू, २) सीसीटीव्ही कॅमेरा चा डी व्ही आर कि अं ८,०००रू, ३) जुना वापरता एच पी कंपनीचा लॅपटॉप कि अं ८,००० रु अशा एकुन ३८,००० रु चा माल तपासात जप्त केलेला आहे.
सदर आरोपीचा मा. न्यायालयातुन पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे. सदर कार्यवाही मा. श्री अरविंद साळवे साहेब, पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. श्री अतुल कुलकर्णी साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. श्री सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले ठाणेदार गडचांदूर, सपोनि. प्रमोद शिंदे, नापोशि. धर्मराज मुंडे, हेमंत धवणे, इंदल राठोड, पोशि. विजय कोटणाके, तिरूपती माने, संदीप थेरे हे तपास करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत