जाहिरात... Advertisement... विज्ञापन

बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू #accident

मुल:- बस स्थानकावरून प्रवासी भरून चंद्रपूर कडे जायला निघालेल्या बसने एका महीलेला अचानकपणे धडकली. धडकेमुळे गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या महीलेचे नाव सरिता मनोज कररेवार वय २६ वर्षे रा. मारोडा असे आहे. हि घटना 1 वाजताचे दरम्यान घडली.
सरीता, पती मनोज व मुलांसोबत गडचिरोलीला जायला मूल बसस्थानकात आली होती. MH40N8951 क्रमांकाची गडचिरोली आगाराची बस मूल येथील बसस्थानकावरून प्रवासी भरून चंद्रपूर कडे जायला निघाली असतांना सरिता अचानकपणे बस धडकली. धडकेने खाली पडल्याने तिचा डोक्याला गंभीर जखम झाली. बस चालकाने तातडीने सदर महीलेला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु उपचार सुरू असतानांच महीलेचा मृत्यू झाला. पुढील तपास मुल पोलीस करित आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत