जाहिरात... Advertisement... विज्ञापन

धावत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू #death

भद्रावती:- धावत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील माजरी रेल्वे स्टेशन येथे आज दि. ४ जून रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
रितेश चौधरी (२७) रा. कटियार जि.तैमूर (बिहार) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबासोबत जानापूर-सिकंदराबाद या सुपर फास्ट रेल्वेने प्रवास करीत होता. दरम्यान, माजरी रेल्वे स्टेशन येताच त्याला गुटखा खाण्याची इच्छा झाली. त्यामुळे तो रेल्वे डब्याच्या दारात उभा राहून गुटखाखाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याचा तोल गेला व तो खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत त्याची पत्नी, ६ महिन्याची मुलगी व पत्नीचे मामा बिराजकुमार पंडित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत