चंद्रपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे जाहीर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. दिनांक ३ जुन २०२२ रोजी सायं. ७.१४ वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्जवे या रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या सभेत त्यांचा पूर्ण परिचय व चंद्रपूर मधील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विविध क्षेत्रात योगदान बद्दल याची माहिती देण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्युसमयी ९१ वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशनचे अध्यक्ष, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदा-या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. १९६७ मध्ये त्यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडाणूक देखील लढली होती. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर चंद्रपूरातील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.
या श्रद्धांजली सभेत बार असोसिएशन अध्यक्ष श्री. ॲड. अभयजी पाचपोर, जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, नगर सहमंत्री वैदेही मुडपल्लीवर, पियूष बनकर, शैलेश दिंडेवर, गणेश नक्षिने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अभाविप चंद्रपूर महानगर मधील कार्यकर्ते व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.