चंद्रपूर:- निवृत्त पोलिस अधिकारी, आदिवासी समाजाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर चे महासचिव एकनाथ कन्नाके यांचे पार्थिव बल्लारपूर जंगलात झाडाला लटकलेले आढले. ही आत्महत्या की हत्या? हे शव विच्छेदन झाल्यानंतरच कळेल. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे.
आदिवासी समाजातील धडाडीचे नेता म्हणून एकनाथ कन्नाके कडे पाहायला जात होते. सर्वांना एकत्र आणण्याची, एवढेच नव्हे तर नवनवीन उद्योगात समरस होण्याची त्यांची खाती होती. पोलीस विभागातून रजा घेतल्यानंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ समाजकार्यात देत असत. अशा या एकनाथ कन्नाके यांचे अकस्मात जाणे हे समाजाला वेदनादायी आहे.