Top News

स्व. रामकृष्ण धोटे यांच्या प्रथम स्मृतिदिन निमित्त वृक्षारोपण, बेडशीट वाटप व भोजनदान.

चुनाळा येथील गोरक्षण व छात्रावास येथे कार्यक्रम संपन्न.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या चंद्रपूर जिल्हा सचिव ऍड. मेघा धोटे यांच्या  स्वर्गीय पती  रामकृष्ण धोटे यांच्या  प्रथम स्मृतिदिना निमित्य नारायणदास मावणी गौशाला व छात्रावास चुनाळा येथे नेफडो तर्फे वृक्षारोपण, धोटे परिवार तर्फे भोजनदान व छात्रावास मधील मुलांना बेडशीट वाटप करण्यात आल्या.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभावती नागापुरे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून बादल बेले,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,नेफडो, डॉ. लखन अडबाले, दिलीप धोटे, लांडे, जेष्ठ नागरिक, संजय पावडे, दिलीप सदावर्ते, माहिती व जनसंपर्क अधिकारी, नेफडो, शिवाजी धोटे, ऍड. मेघा धोटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरानी स्व. रामकृष्ण धोटे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना स्वतःला  आलेले अनुभव, राम धोटे यांच्या कार्यपद्धती विषयी आपले मत व्यक्त केले.


 " मरावे परी कीर्ती रुपी उरावे " या उक्तीप्रमाणे आपले कार्य असले पाहिजे. जीवन - मरणाच्या या फेऱ्यात मानवाने सामाजिक दायित्वाची जाणीव ठेऊन कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. अतिशय भाऊक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्का सदावर्ते, नागपूर विभाग अध्यक्षा, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती यांनी केले. तर आभार ऍड. मेघा रामकृष्ण धोटे, महिला जिल्हा सचिव, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक समिती यांनी मानले. यावेळी विजयकुमार जांभूळकर,  संतोष देरकर, भास्कर करमरकर, नितीन जयपुरकर,  मंजुषा जयपुरकर, जयश्री देशपांडे,  अंजली गुंडावार, ओमप्रकाश गुंडावार, अरविंद लांडे, मंदार धोटे,  ज्ञानदा धोटे,  बापू धोटे आदीसह अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, धोटे परिवार व अन्य सहकारी मित्र परिवार, संस्थेचे पदाधिकारी, नागरिक यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने