💻

💻

पोंभुर्णा तालुक्यातील पथदिवे बंद होऊ देणार नाही:- आ. सुधीर मुनगंटीवार chandrapur pombhurna bjppombhurna


पोंभुर्णा:- तालुक्यातील ११ ग्राम ग्रामपंचायतींना पथदिव्यांची लाईट कापण्याचे पत्र महावितरण कडून देण्यात आले होते. त्यानंतर काही सरपंच यांनी विभागाचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेशी चर्चा केली व सविस्तर समस्या समजावून सांगितली. त्यानंतर लगेचच सुधीरभाऊंनी महावितरण अधिकाऱ्यांची बैठक बोलावली व पोंभुर्णा तालुक्यातील कोणत्याही गावातील पथदिवे बंद होणार नाही अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात्मक निर्णय घेत पथदिव्यांची लाईट कापण्याची मोहीम थांबवली.
भविष्यातही पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही या संदर्भात मंत्रालय सुद्धा चर्चा करणार असल्याचे सरपंच यांना आश्वासन देण्यात आले. आज सर्व गावात पथदिवे सुरु आहेत या विभागाचे आमदार म्हणून नेहमी वयक्तिक पातळीवर जी मदत करता येईल ती करत असतात पण जनतेची गैरसोय होऊ देत नाहीत. तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने सुधीरभाऊंचे आभार मानले.
यावेळी अल्का आत्राम, सुलभा पीपरे, अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख, ऋषी कोटरंगे, नंदा कोटरंगे, धनराज बुरांडे सरपंच जामखुर्द, भालचंद्र बोधळकर सरपंच जामतुकूम, शुभांगी कुत्तरमारे सरपंच चिंतलधाबा, मीनाक्षी ठेंगणे सरपंच चेकबाल्लारपूर, थामेश्वरी लेनगुरे सरपंच उमरी, पूनम चुधरी सरपंच जुनगाव, सुरेखा मेश्राम सरपंच चेकठानेवासना, रणजित पिंपळशेंडे उपसरपंच भीमणी, प्रवीण लांबाडे उपसरपंच चेक बल्लारपूर, वैभव पिंपळशेंडे, राजू ठाकरे आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत