घनोटी नं. २ येथील नागरिकांचा भाजपात प्रवेश #bjp #bjppombhurna

Bhairav Diwase
0

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत प्रवेश
पोंभुर्णा:- माजी अर्थमंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या उपस्थितीत 26जुनला घनोटी नंबर २ येथील नागरिकांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांनी भाजपाचे माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केला.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामामुळे बहुतेक गावातील नागरिक भाजपा मध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. आ. सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री असतांना गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. भाजपा पक्ष मध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी समाधानी व्यक्त केली आहे. आजचा पक्ष प्रवेश भाजपाला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. पक्ष प्रवेश हा भाजपा पक्षाला पाठबळ देऊन अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी भाजपाचे राहुल संतोषवार यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित ग्रा.प.सदस्य यशवंत ढोंगे, नानाजी टेकाम, किशोर दुधबळे,नंदाजी मडावी, मांसराम कोडापे, अविनाश गेडाम,संदिप ठाकरे,राजु ठाकरे,लक्ष्मण गव्हारे,चंद्रशेखर झगडकर इत्यादी भाजपचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)