Top News

चंद्रपुरात वनपालाला लाच घेताना रंगेहाथ अटक #chandrapur #saolinews #saoli

चंद्रपूर:- तक्रारदार हे मौजा गुंजेवाही, तह. सिंदेवाही येथील रहीवासी असुन तक्रारदार यांनी गावातील शेतकरी यांच्या शेतातील कटींग केलेले सागवान लाकुड वाहतुक करण्याकरीता लागणारा ठेकेदाराकरीता निर्गत परवाना ( T.P.) देण्याच्या कामाकरीता उपक्षेत्र पाथरी येथील वासुदेव लहानुजी कोडापे, पद वनपाल, उपक्षेत्र पाथरी, परीक्षेत्र सावली वनविभाग चंद्रपुर यांनी तक्रारदाराकडे १,०२,००० / - रु . ची मागणी केल्याचे तक्रारीवरुन दिनांक ०३/०६/२०२२ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी व सापळा कार्यवाहीदरम्यान उपक्षेत्र पाथरी येथील वासुदेव लहानुजी कोडापे, पद वनपाल, उपक्षेत्र पाथरी यांनी तक्रारदाराकडे १,०२,००० / - रु . लाचेची मागणी करुन तडजोडअंती १,००,००० / - रु . स्वतः स्विकारल्याने त्यांचे शासकिय निवास स्थानी पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही राकेश ओला, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला.प्र. वि. नागपुर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, श्री अविनाश भामरे , ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती शिल्पा भरडे , तसेच कार्यालयीन स्टॉफ स.फौ. रमेश दुपारे नापोकॉ . नरेश नन्नावरे पो.अ. रविकुमार ढेंगळे , वैभव गाडगे व चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने