Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राइव्हची मोहीम सुरू #chandrapur #chandrapurpolice

Bhairav Diwase

वाहनचालकांनी ड्रंक अँड ड्राइव्ह करू नये, चंद्रपूर पोलिसांचे आवाहन
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील वाहन अपघातामध्ये वाढ होत असल्याने चंद्रपुर जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयात नशा करुन चारचाकी व दुचाकी वाहन चालविणारे वाहन चालकाविरुध्द मोहीम राबविण्यात येत आहे. 
नशा करुन वाहन चालविणाऱ्या लोकांमुळे त्याला व इतर सामान्य नागरीकांना जिवीताची व मालमत्तेची हानी होण्याची संभावना आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला ब्रेथ एनालायजर मशीन देण्यात आली आहे व ड्रंक अँड ड्रॉईव्हची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.
  दुचाकी स्वारांचे अपघात प्रमाण बघता हेल्मेट परीधान न केल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. राज्य तथा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी स्वारांनी हेल्मेट परीधान करावे अन्यथा त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांनी दिली.