जाहिरात... Advertisement... विज्ञापन

डम्पिंगयार्डची योग्य सोय करून कामगारांचे थकीत वेतन द्या; महानगर भाजपाची मागणी #chandrapur


महानगरपालिकेवर निघाला मोर्चा
चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीने अष्टभुजा वार्ड येथील जनतेला न्याय मिळावा म्हणून तर डम्पिंग यार्डच्या कामगारांना वेतन मिळावे म्हणून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात भाजपा नेते रवी गुरनुले, सुभाष कासनगोट्टुवार, ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे, राम लाखियाॅ, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, रुद्रनारायण तिवारी, धनराज कोवे, राकेश बोमनवार, रवी लोणकर, संदिप आवारी, संजय कंचर्लावार, रामकुमार आकापेल्लीवार, रितेश वर्मा, आकाश मस्के, महेश कोलावार, अमित निरंजने, प्रविन उरकुडे, आकाश ठुसे, बंडू गौरकार, सतीश तायडे, पप्पू बोपचे, प्रलय सरकार, निलिमा देवनाथ, पूनम रामटेके, बेबी मेश्राम, भूमिका खोब्रागडे, चंद्रिका भाजी, बिना मेहता, वासना मेहता, अंजना पोहनकर, पौर्णिमा रामटेके, रिना राॅय, सरस्वती मंडल, गीता सरकार, सुमन राॅय, विद्या उराडे, पिंगला धळसे, नम्रता नकारे, शैला उके, कल्याणी मंडल यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
डॉ.गुलवाडे म्हणाले,अष्टभुजा वार्ड लगत किमान 12 वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापनासाठी डम्पिंग यार्डची निर्मिती करण्यात आली.या यार्ड मधील कचरा आता लोकवस्ती पर्यंत पोहोचला आहे.त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागले आहेत.येथील सर्व कुपनलिकेला येणारे पाणी व हवा प्रदूषित झाली आहे.ज्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे.अश्यातच येथील कचऱ्याला आग लागल्याने सर्वत्र धूर पसरत आहे.परीणामी हे क्षेत्र विविध रोगाचे माहेर घर बनले आहे.त्यामुळे मनपा प्रशासनाने वेळीच योग्य उपाय योजना करून नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे.
याच शृंखलेत,डम्पिंग यार्ड येथे काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनाचा व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या संसाधनांचा प्रश्न देखील गंभीर आहे.या कामगारांना मागील 6 महिन्यापासून वेतन मिळाले नसून देण्यात येणारे वेतन नियमाला अनुसरून नाही.आपण जातीने लक्ष घालून वेतन उपलब्ध करून द्यावे.
यार्डवर काम करण्यास गम बूट,मास्क व हॅन्ड ग्लोब्ज उपलब्ध नसल्याने कामगारांच्या हातापायाला इजा पोहोचत आहेत.त्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.हा सम्पूर्ण प्रकार अत्यन्त निदनिय आहे.मनपा प्रशासनाला याची जाणीव असतांना जनतेचे आरोग्य धोक्यात टाकण्यात येत आहे,याचा आम्ही निषेध करतो.असे ते म्हणाले.
डम्पिंगयार्डची योग्य सोय करून,कामगारांना त्यांचे थकीत वेतन शासकीय नियमानुसार त्वरित द्यावे,अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडेल.अशी चेतावणी त्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत