जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भाजपाने साजरा केला शिवराज्याभिषेक दिन #chandrapur #bjpchandrapur

छत्रपतींच्या पराक्रमाचे केले गुणगान
चंद्रपूर:- येथील पटेल हायस्कूल समोर लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या शाही दरबारातील शिवबांच्या प्रतिकृतीला माल्यार्पण करून महानगर भाजपा तर्फे सोमवार 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेन्द्र गांधी, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवी गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, राम लाखीया, सचिव रामकुमार अकापेलिवार, रुद्रणारायण तिवारी, संदिप आगलावे,सचिन कोतपल्लीवार,धनराज कोवे,राकेश बोमनवार,रवी लोणकर, संदिप आवारी, संजय कंचर्लावार, रितेश वर्मा, आकाश मस्के, महेश कोलावार, अमित निरंजने, प्रविन उरकुडे आकाश ठुसे, बंडू गौरकार, सतीश तायडे, पप्पू बोपचे, प्रलय सरकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ. गुलवाडे म्हणाले, शिवाजीमहाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1595 म्हणजेच 6जून 1674ला शिवरायांचा राज्याभिषेक झालाआणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारोभार आणि पदे वाटून देण्यात आली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून संभाजी महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.त्या पावनदिनाची आठवण चिरकाल रहावी म्हणून हा दिवस आपण साजरा करतो.छत्रपतींच्या शौर्यगाथा विदेशातही शिकविल्या जातात,याकडे त्यांनी लक्ष वेधले.यावेळी राम लाखीया यांनी छत्रपतींच्या पराक्रमावर प्रकाश टाकला.शिवबांच्या पराक्रमाचे यावेळी गुणगान करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते यांची उपस्थिती होती.जय भवानी-जय शिवाजी चा जयघोष करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत