जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ताडोबा बफर क्षेत्रातील नागरिकांच्‍या समस्‍यांबाबत भाजपाचे जनआक्रोश आंदोलन #chandrapur


मागण्‍या त्‍वरीत पूर्ण न केल्‍यास आंदोलन अधिक तिव्र करणार:- देवराव भोंगळे
चंद्रपूर:- ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत बफर क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्‍यांचा सामना करावा लागत आहे. हा परिसर आदिवासीबहुल असल्‍यामुळे येथील नागरिक फार पूर्वीपासून जंगलावर आधारित व्‍यवसाय करून आपल्‍या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. हे नागरिक वनजमिनीवर अतिक्रमण करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. नागरिकांनी वन‍जमिनीचे स्‍थायी पट्टे मिळण्‍यासाठी रितसर दावे केले आहे. मात्र वनविभागातर्फे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्‍याची मोहीम राबविली जात आहे. हा सदर नागरिकांवर अन्‍याय आहे. हा अन्‍याय दुर करावा यासाठी हा आक्रोश आहे. सदर नागरिकांना न्‍याय न मिळाल्‍यास भारतीय जनता पार्टी आंदोलन अधिक तिव्र करेल असा ईशारा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी दिला.
बफर क्षेत्रातील नागरिकांना होणा-या त्रासाबद्दल वनविभाग व राज्‍य सरकारच्‍या विरोधात भाजपा चंद्रपूर तालुका तसेच भाजपा आदिवासी आघाडीतर्फे दिनांक १७ जून रोजी जनआक्रोश आंदोलन करण्‍यात आले. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात हे आंदोलन करण्‍यात आले. यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह, चंद्रपूर भाजपा तालुकाध्‍यक्ष हनुमान काकडे, माजी जि.प. सदस्‍य रोशनी खान, अॅड. हरीश गेडाम, गौतम निमगडे, भाजपा जिल्‍हा सरचिटणीस नामदेव डाहूले, माजी पंचायत समिती सभापती केमा रायपुरे, अशोक आलाम, विलास टेंभुर्णे, फारूख शेख, लटारू लोनबले, अनिता भोयर, श्रीनिवास जंगमवार, दिपक खनके, राकेश गौरकार, शांताराम चौखे, रंजना किन्‍नाके आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.वनदावे मंजूर करतांना लावण्‍यात आलेली तिन पिढयाची अट रद्द करून स्‍थायी पट्टे देण्‍यात यावे, जे शेतकरी २५ ते ३० वर्षापासून शेतजमिनीची वहीवाट करीत आहे त्‍यांना त्‍यांच्‍या जमिनी परत देण्‍यात याव्‍यात, वनविभागाकडून लावण्‍यात आलेले खोटे गुन्‍हे मागे घेण्‍यात यावे, वनविभागाकडून जनतेला वारंवार ३५३ कलम लावण्‍याची धमकी दिली जाते ती त्‍वरीत थांबविण्‍यात यावी, मोहफुल व तेंदूपत्‍ता विक्रीचे केंद्र देण्‍यात यावे, बांबु कारागिरांना बांबु पुरवठा करून त्‍यांना रोजगार उपलब्‍ध करून देण्‍यात यावा, गॅस सिलेंडरचा रिफील मोफत देण्‍यात यावा, या परिसरातील पट्टेधारक शेतक-यांना मोफत लोखंडी जाळीचे कुंपण उपलब्‍ध करून देण्‍यात यावे, पिंपळखुट व सर्व गावाच्‍या हद्दीत लावलेले चेक पोस्‍ट त्‍वरीत बंद करण्‍यात यावे, बफर क्षेत्रातील जिप्‍सी धारक व गाईड यांच्‍या समस्‍या त्‍वरीत सोडविण्‍याबाबत या मागण्‍यांसाठी आंदोलन करण्‍यात आले.
ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाच्‍या बफर कार्यालयासमोर भाजपातर्फे धरणे देण्‍यात आले व राज्‍य सरकार तसेच वनविभागाच्‍या विरोधात घोषणा देण्‍यात आल्‍या. आंदोलनानंतर वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प यांना निवेदन सादर करण्‍यात आले. आंदोलनात बफर क्षेत्रातील नागरिक व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्‍येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत