जाहिरात... Advertisement... विज्ञापन

MSEB कडून वाढीव वीज बिलावर युवा मोर्चाचे निवेदन #chandrapur

जनतेला वाढीव वीज बिल पाठविणे बंद करा अन्यथा युवा मोर्चा कडून जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल:- आशिष देवतळे
चंद्रपूर:- महाराष्ट्र विद्युत विभागाकडून गेल्या काही दिवसापासून सर्वसामान्य जनतेला दडपशाही पद्धतीने अतिरिक्त वीज बिल पाठविण्याचे काम MSEB कडून सुरू आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो.
कोरोना काळातदेखील वीज बिल माफ करण्याचे आश्वासन देऊन जनतेची फक्त दिशाभूल या सरकारने केली मात्र वीज बिल माफ करून जनतेला दिलासा दिला नाही आणि आता मनमर्जी पद्धतीने अतिरिक्त वीज बिल पाठवून जनतेला त्रास देण्याचे कार्य या महाराष्ट्र सरकारकडून सातत्याने सुरू आहे. यावर आळा घालण्याकरिता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय बल्लारपूर येथे निवेदन दिले. व या निवेदनाद्वारे लवकरात लवकर चंद्रपूर जिल्ह्यात MSEB कार्यालयाकडून जनतेची होणारी लूट बंद करा अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.अशी चेतावणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकारला दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत