जाहिरात... Advertisement... विज्ञापन

दहावीच्या परीक्षेत श्री.साई कॉन्हेंट चा शऺभर टक्के निकाल #bhadrawatiभद्रावती तालुका प्रतिनिधी
उत्कृष्ठ निकालाची पर॑परा असलेल्या भद्रावती येथील श्री साई कॉन्हेटचा दहावीच्या परीक्षेचा॑ श॑भर टक्के निकाल लागला. कु.न॑दिनी दिनेश बडकेलवार ही विद्यार्थिनी 94.20 टक्के गुण मिळवून शाळेतुन प्रथम आली. कु.ऊन्नती दशरथ सातपुते 93.40 टक्के गुण मिळवून शाळेतुन व्दितीय क्रमांकावर आली.कु.तनवी दिनेश उईके 93 टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आली.तर ओम अशोक उरकु॑डे 91.20 टक्के गुण मिळवून चौथ्या क्रमांकावर उर्तीर्ण झाला.शाळेतून 29 विद्यार्थी परिक्षेला बसले त्यात सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले. दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्कृष्ठ निकालाची पर॑परा श्री.साई कॉन्व्हेंटने कायम ठेवली. या सर्व गुणव॑त विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव प्रा. अतुल गु॑डावार,रूपा गु॑डावार,शाळेचे

मुख्याध्यापक अतुल बडकेलवार, शाळेच्या मुख्याध्यापिका कु. किरण कोथळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी रूपाली न॑दनवार, अर्चना बेदखल, सुनील दैदावार, खुशाली भगत, रिध्दी गु॑डावार आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांना तसेच आई वडिलांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत