जाहिरात... Advertisement... विज्ञापन

एबीस कंपनीचा गडर जनावरांसाठी ठरतोय धोकादायक #korchi

कोरची:- कोरची तालुक्यातील बोरी- जामनारा येथे सुरू असलेल्या एबीस कंपनीमधील कोंबड्यांचा शौच डंपिंग करिता कोहका गावालगत बनविलेला गडर हा परिसरातल्या मुक्या जनावरांसाठी धोकादायक ठरून त्या गडर मध्ये आज पर्यंत सात ते आठ जनावरे पडले होते परंतु त्वरित बाहेर काढल्यामुळे कोणत्याही जनावराला हानी झालेली नसली तरी त्याचा त्रास शेवटी शेतकऱ्याला होत आहे अशी माहिती कोहका गावातील नागरिकांकडून सांगण्यात आले.
मागील दोन ते तीन वर्षापासून गाजत असलेला एबीस कंपनी चा मुद्दा हा सुटणार काय असाही प्रश्न गावातील नागरिकांनी केली आहे. एकीकडे कंपनीमध्ये होत असलेल्या प्रोडक्शनच्या दुर्गंधी वासेमुळे नागरिकांचा जीवन जगणे कठीण झाले आहे. कंपनीने गावालगत बनविलेल्या गडरच्या सभोवताल संरक्षण भिंत न बांधता उघड्यावर ठेवल्यामुळे जंगलात चरण्यासाठी गेलेले जनावरे त्या गडर मध्ये नेहमीच पडत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी पडलेल्या जनावरांना बाहेर काढण्याची कामे करावे का असे वक्तव्य नागरिकांकडून केले जात असून शेतकऱ्यांचा मोठा नुकसान होत आहे.
त्यामुळे भविष्यात लाखो रुपये किमतीचे जनावरांचा नुकसान झाल्यास भरपाई कोण करून देणार त्या चिंतेत शेतकरी पडले आहेत. एबीस कंपनीने परिसरातील नागरिकांना दुर्गंधी च्या वासेमुळे होणाऱ्या त्रासावर थोडा दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांचे जनावरे जंगलात दिवसभर चरायला जातात. त्या कालावधीत एखादा जनावर गडर मध्ये पडल्यानंतर त्याला बाहेर निघता येत नाही. गडर हा 10 ते 12 फूट खोल खड्डा असल्यामुळे जनावरे त्या ठिकाणी होरपळून मृत्यू होण्यास नाकारता येत नाही. चार दिवसा अगोदर सुद्धा एक जनावर त्या ठिकाणी पडलेला होता. त्याला नागरिकांनी बाहेर काढत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
कंपनी नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ खेळतच आहे. परंतु तेथील शेतकऱ्यांच्या जनावरांचा सुद्धा जीव घेण्यास वेळ लागणार नाही असे नागरिक आरोप करीत आहेत. सध्या शेती हंगाम सुरू असून शेतकऱ्यांचे जनावरे त्या गडर मध्ये पडून मृत्यू झाल्यास त्या परिस्थितीत वेळेवर शेती हंगाम उपयोगासाठी त्या गोरगरीब शेतकऱ्यांनी वेळेवर कुठल्या पैशाने जनावर विकत घेऊन आणावे ही तारेवरची कसरत शेतकऱ्यांसमोर उभी आहे. पावसामध्ये पुन्हा ते गडर पावसाने भरून पुन्हा जनावरांसाठी धोक्याचे ठरेल त्यामुळे कंपनीने बनवलेला तो गडर बुजवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

बोरी आणि जामणारा येथे एबीस कंपनीने पोल्ट्री फार्म सुरू केले आहे तेथील कोंबड्यांचे शौच जमा करण्यासाठी कोहका गावालगत गडर बनविले आहे. माझे स्वतः चे 4 जनावरे त्या गडरमध्ये पडले होते. जंगलात चरण्यासाठी गेलेले जनावरे त्या गडर मध्ये नेहमीच पडत असल्याने जनावरांसाठी धोकादायक ठरत असून जनावरांचा जीव कधीही जाऊ शकतो. तीन ते चार दिवसा अगोदर सुद्धा एक जनावर त्या गडर मध्ये पडला होता. परंतु नागरिकांनी त्या जनावराला बाहेर बाहेर काढले.
नरसिंग उमेंदी कपुरडेरीया शेतकरी कोहका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत