Top News

क्रीडा संस्कृती फाऊंडेशन नाशिक व्दारा डॉ. विजय सोमकुंवर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित #chandrapur


चंद्रपूर:- क्रीडा संस्कृती फाऊंडेशन नाशिक व्दारा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दि. २३ जुन २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता शुभमंगल कार्यालय, रासबिहारी शाळे मागे, बळी मंदिर शेजारी, आग्रा रोड, पंचवटी, नाशिक येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने डॉ. विजय सोमकुंवर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सरदार पटेल महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर येथे कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी विद्यापीठ स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महाविद्यालयाचे नाव लौकीक केले.
तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात येणारा शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा विद्यार्थ्यांना मिळालेले आहे. डॉ. विजय सोमकुंवर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उत्कृष्ट आयोजन नुकतेच पार पडले आहे. तसेच दरवर्षी सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे एक माह निःशुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करतात. या यावर्षी त्यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉल, योगा, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, नेटबॉल, कराटे इत्यादी खेळांचे निःशुल्क प्रशिक्षण दिले. इत्यादी कार्याची दखल घेत डॉ. विजय ए. सोमकुंवर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत.
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सौ. सुधाताई पोटदुखे, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉक्टर किर्तीवर्धन दीक्षित, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉक्टर स्वप्नील माधमशेट्टीवार, डॉ. कुलदीप गोंड, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टर विजय सोमकुंवर यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने