Click Here...👇👇👇

किराणा दुनाकानातून ६९ हजार ६८० रुपयांची चोरी #Theft

Bhairav Diwase
कोरची:- कोरची शहराच्या मुख्य बाजार चौकातील एका प्रतिष्ठित व्यापारीच्या किराणा दुकानामध्ये अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व खाद्य सामानासोबत हजारो रुपयाची चोरी केल्याची घटना आज पहाटे उघकळीस झाली आहे. कोरची शहरातील बाबुलाल किराणा स्टोर्स चे मालक बाबुलाल धुवारिया यांच्या मालकीच्या दुकानात बुधवारच्या रात्रोला अज्ञात भुरट्या चोरट्यांनी दुकानाच्या एका दाराच्या कुलुपाचे कब्जे हँडल तोडून दुकानात शिरून चोरट्यानी दुकानातील आलमारीच्या कपाडात ठेवलेली ५० हजार रोख रक्कम व दुकानात विक्रीसाठी ठेवलेली खाद्य तेलाचे पाच पिपे,तेल पाकिटांची चार पेट्या असे मिळून ६९ हजार ६८० रुपये रोख रक्कमेसह सामानांची चोरी केलेली आहे.
नेहमी प्रमाणे धुवारिया परिवार काल रात्रौ ८:३० वाजता सुमारास दुकान बंद करून नवीन घराकडे झोपण्यासाठी गेले होते आणि आज पहाटे ६:०० वाजता दरम्यान नियमित प्रमाणे किराणा दुकान उघण्यासाठी आले असता दुकानाचे दार उघडे दिसून आले दुकानाच्या आतमध्ये गेले तेव्हा त्यांना आलमारी उघडी व सामान इकडे तिकडे विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले हे बघून त्यांनी कोरची पोलीस ठाण्यात माहिती दिली.
त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल फडतरे सह पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनेची संपूर्ण पाहणी व चौकशी करून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कोरची पोलीस स्टेशनमध्ये कलम ४५७,३८० भांदवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनात या चोरीचे अधिक तपास पोलीस तेजराम मेश्राम हे करीत आहेत.