37 वर्षीय युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला #chandrapur #death

चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरातील घटना
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील लालपेठ परीसरातील माता नगर चौकात 37 वर्षीय मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतक युवकाचे नाव सतीश नगराळे असे आहे.
सतीश चा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अजूनही सविस्तर माहिती मिळाली नसून सध्या फॉरेन्सिक लॅब च्या चमूने तपास सुरू केला आहे. सतीश ची हत्या की नैसर्गिक मृत्यू? याबाबत अजूनही स्पष्ट माहिती नाही.
सदर माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे व गुन्हे शोध पथकाचे जयप्रकाश निर्मल चमुसहित घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांच्या तपासात कारण निष्पन्न होणार. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत