Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

करण देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्र्या व खाऊचे वाटप #birthday

मूकबधिर व अपंग कलाकारांसोबत साजरा केला वाढदिवस
भद्रावती:- भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व माजी मंत्री स्व. संजय देवतळे यांचे सुपुत्र करण देवतळे यांनी आपला २७ वा वाढदिवस आनंदवनातील स्वरानंदनवन मधील अपंग ,मूकबधिर कलाकारांसोबत साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे. करण संजय देवतळे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम स्व. संजय देवतळे मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता.

सर्वप्रथम वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वितरण करण्यात आले. त्यानंतर आनंदवनातील रुग्णालयात असलेल्या रुग्णांना फळ व बिस्किट वितरित करून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना छत्रीचे वितरण करण्यात आले.
तसेच आनंदवनातील स्वरानंदनवन या ख्यातनाम आर्केस्ट्रा मधील विविध कलाकारांसोबत त्यांनी वेळ देऊन वाढदिवस साजरा केला. यावेळी आनंदवनातील सभागृहात केक कापून करण देवतळे यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संपूर्ण अंध व अपंग कलाकारांना करण देवतळे व श्वेताताई देवतळे यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले व मधुर स्वरात कलाकारांनी गीत सादर केले.
यावेळी करण यांनी श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई आमटे तसेच स्व.शितलताई आमटे यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. तसेच मूकबधिर लहान विद्यार्थ्यांना सुद्धा खाऊचे वाटप करण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शहरातील गजानन नगर येथील स्व. संजय देवतळे उद्यान मध्ये वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.
या विविध संपूर्ण कार्यक्रमांत माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजप नेते बाबासाहेब बागडे, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, खरेदी विक्री संस्थेचे उपाध्यक्ष विजय मोकाशी, संचालक बाळूभाऊ भोयर, विठ्ठल लेडे, विलास गयनेवार, मोहन रंगदड, उमेश शर्मा, आशिष ठाकरे, अमित चवले, जगदीश तोटावर, विलास दारापुरकर, परसराम मरसकोल्हे, सुधाकर कुंकूले ,महेश श्रीरंग, अभिजीत गयनेवार, विशाल कुंकुले, कादर शेख, सतीश कांबळे, चारू पाटील देवतळे, विशाल ढवस, डॉ. प्रफुल खुजे, निलेश देवतळे, सुरज येरणे तसेच बरीच मित्रमंडळी अभिष्टचिंतन कार्यक्रमाला उपस्थित होती.
आनंदवनातील आयोजित वाढदिवस कार्यक्रमासाठी डॉ.अविनाश पोळ, सदाशिवराव ताजने, सुधाकर कडू गुरुजी, राजेश ताजने यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत