Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

भोयेगाव येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू #chandrapur #Korpana #Gadchandur

घात कि अपघात? कारण मात्र गुलदस्त्यात

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना

कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भोयेगाव येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रात्रौच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव सचिन सुभाष पानघाटे (वय २६) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोयेगावातील स्वागत गेट जवळ सचिन पानघाटे याच शव मिळाले असून सचिन ची हत्या झाली असावी असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. हा अपघात नसून घात आहे? अशी गावात चर्चेला उधाण आले आहे. सचिन हा आई वडीलाचा आधार होता त्याच्या जाण्याने परीवारावर दुःखाचं डोंगर कोसळलं असून गावात शोककळा पसरली आहे.

  घटनास्थळी गडचांदूर पोलिस दाखल होत पंचनामा केला. व शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. हा घात की अपघात? कारण मात्र गुलदस्त्यात असून तपासाअंती सत्य बाहेर येतील. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत