डुकराच्या मासासह एक ताब्यात; वनसडी वनविभागाची कारवाई
कोरपना:- वनसडी वनपरिक्षेत्र येथील दिनांक 7 जुलेला गुप्त माहितीच्या आधारे वन खंड क्रमांक 31 लगत वेस्ट वेअर नाला परिसरात काही अज्ञात इसम रानडुक्कर वनप्राण्याची शिकार करून कापत असल्याची गुप्त माहिती व वन विभागाला मिळाली.
त्या आधारे वन क्षेत्रातील अधिकारी चौधरी मॅडम व सहकारी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठून पाहणी केली असता घटनास्थळावरून डुकराचे कापलेले मास व एक आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर वन जीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये वनगुन्हा क्रमांक 09008/225187/2022 नोंदवण्यात आले.
हि कारवाई चौधरी मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी याच्या मार्गदर्शनाखाली टोंगे क्षेत्र सहाय्य गडचांदूर, नियत वनरक्षक गडचांदूर वरझडी आंबेझडी यांनी केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत