भोयेगाव येथील युवकाचा अपघात #accident #Korpana #Gadchandur


पोलिसांनी "आधार न्युज नेटवर्क"ला दिली माहिती

कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भोयेगाव येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रात्रौच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव सचिन सुभाष पानघाटे (वय २६) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भोयेगावातील सचिन पानघाटे याच शव मिळाले असून सचिन ची हत्या झाली असावी असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. हा अपघात नसून घात आहे? अशी गावात चर्चेला उधाण आले होते.
घटनास्थळी गडचांदूर पोलिस दाखल होत पंचनामा केला. व शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. हा घात की अपघात? कारण मात्र गुलदस्त्यात होते. मात्र तपासाअंती सत्य बाहेर आले असून सचिनचा अपघात झाल्याची माहिती आधार न्युज नेटवर्क ला देण्यात आली. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत