राजुरा:- चितळ आणि घोरपड या वन्यजीवांची शिकार करणाऱ्या चार आरोपींना चंद्रपूर वनविभागाने अटक केली. आरोपींचा घरातून मांस आणि शिकारीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.
मदन मोरे, विजय मोंडे, आकाश आत्राम, गोपी आत्राम अशी आरोपींची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार, चंद्रपू जिल्ह्यातील राजुरा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना चितळाची शिकार केल्याची गुप्त माहिती मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी मदन मोरे यांच्या घरी धाड टाकली. मांस शिजविण्याच्या तयारीत असतानाच त्याला पकडण्यात आले.
ताब्यातील आरोपीने शिकारीत सहभागी आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार चुनाळा येथील विजय मोंडे, बामनवाडा येथील आकाश आत्राम, राजुरातील बेगरवस्ती सुका उर्फ गोपी आत्राम या आरोपीना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
चितळ आणि घोरपडीचे मांस, कुऱ्हाड, विळा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.