Top News

अवैध वाहतूक करतांना ३० गोवंश जनावरे जप्त #chandrapur #police #saoli


सावली:- गडचिरोली ते मुल मार्गावरून सावली पो. स्टे हद्दीतुन काल ०७ जुलै २०२२ रोजी सकाळ दरम्यान अवैध गोवंश जनावरे वाहतुक होणार आहे. अशी गोपनीय माहीती प्राप्त होती. त्यावरून चकपिरंजी ते सावली दरम्यान अचानक नाकाबंदी केली असता सकाळी अंदाजे ०७:३० च्या सुमारास मिळालेल्या गुप्त खबरेनुसार गडचिरोली दिशेकडून एका संशयीत ट्रकला थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये लहानमोठे एकूण ३० गोवंश जनावरे वाहनाची क्षमता नसतांना अत्यंत निर्दयतेने, कुरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधून कोंबुन बसवून ठेवलेले दिसून आले. दोन्ही ट्रकमधील मिळून ३० गोवंश जनावरे कीमत अं ३,००,००० रू अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क MH 29 AN 5786 कीमत २०,००,००० रू. एक मोबाईल की अं १०,००० रू असा एकूण २३,१०,००० रू चा माल जप्त करण्यात आला. सदरचे जप्त जनावरे ही त्यांच्या सुरक्षीतता व आरोग्याच्या दृष्टीने गोशाळेत दाखल करण्यात आले.
प्राथमीक स्वरूपात मिळून आलेल्या ट्रकचा चालक आरोपी शेख इरफान शेख मलंग वय २५ वर्ष रा. केरामेरी जि. आसीफाबाद तेलंगणा राज्य याचेविरूद्व महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम ५(अ), (ब), प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११डी, एफ, महाराष्ट पोलीस अधिनियम कलम ११९, मोटरवाहन अधिनियम कलम ८३/१७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे साहेब, प्रभारी अपर पोलीस अधिक्षक शेखर देशमुख साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे साहेब, ठाणेदार आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवालदार दर्शन लाटकर, दिलीप मोहुर्ले, पो. का धिरज पिदुरकर, दिपक चव्हाण यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने