काय हा रोड, काय ते खड्डे, काय तो चिखल, तरी पण इरई गाव ओके #chandrapur #Korpana

Bhairav Diwase
0

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- तालुक्यातील इरई ते कवठाळा ६ किलोमीटर मेन रोड ची अवस्था अक्षरशाह चाळणी सारखी अवस्था झाली असून खड्डे इतके झाले आहेत की रोड शोधणे अवघड झाले आहे. खड्यात पाणी साचल्या मुळे पायी चालणाऱ्या माणसांना सुद्धा अवघड झाले आहे. काय हा रोड, काय ते खड्डे, काय तो चिखल, तरी पण इरई गाव ओके म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
या रोड ला दररोज खुप वर्दळ असते. या मध्ये टुव्हीलर थ्रीव्हीलर, फोरव्हीलर, बैलबंडी इत्यादी वाहनांची गर्दी असते परंतु चार चाकी वाहनास चालवनाऱ्याना तर तारेवरची कसरत केल्या जाणवत असेल कारण की खड्डे भरपूर झाल्यामुळे कोणचा खड्डा चुकवावा हे समजण्यास अवघड बनले असून रोड मुळे खुप दुर्घटना होत असून.या कडे गट ग्रामपंचायत भारोसा प्रशासन कधी लक्ष देणार आहे का? अशा प्रश्न इरई येथील युवा कार्यकर्ते निखिल पिदूरकर करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)